Shrinager | आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले | Sakal |

श्रीनगरमधील ‘सिराज बाग’ या नावाने ओळखले जाणारे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले झाले. फुललेल्या ट्युलिप्सची झलक पाहण्यासाठी पर्यटकांनी बागेत गर्दी केली होती. इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन, श्रीनगरमधील झाबरवान टेकडीच्या पायथ्याशी आहे. ही बाग आशियातील सर्वात मोठी ट्यूलिप बाग आहे आणि ती 2007 मध्ये उघडण्यात आली होती. फुलशेती विभागाने विविध प्रकारच्या ट्यूलिप्ससह बाग अधिक आकर्षक दिसण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

#JammuKashmir #Srinagar #SirajBagh #TulipGarden #Tourism #Marathinews